(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमीमार्फत पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

हिंदी, सिंधी, गुजराती साहित्य अकादमीमार्फत पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई ( १२ जून २०१९ ) : महाराष्ट्र राज्य हिंदी/सिंधी/गुजराती साहित्य अकादमीमार्फत सन 2018-19 चे पुरस्कार आणि सन 2019-20 साठी पुस्तक प्रकाशन आणि ग्रंथालय अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य हिंदी/सिंधी/गुजराती साहित्य अकादमी मार्फत देण्यात येणारे विविध पुरस्कार, पुस्तक प्रकाशन अनुदान आणि ग्रंथालय अनुदानासाठी प्रवेशिका मागविण्यात आल्य आहेत. महाराष्ट्र राज्यात 15 वर्ष रहिवाशी असणारे साहित्यकार उपरोक्त पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदान योजनेसाठी प्रवेशिका पाठवू शकतात. विविध योजनांसाठीच्या प्रवेशिका कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई- 400001 येथे 25 जून पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येतील. उपरोक्त योजनांची संबंधित अधिक माहिती, नियम, अटी व शर्ती, अर्ज www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीनतम संदेश या मथळ्याखाली उपलब्ध आहे. अधिक माहितीकरिता 022-22672539 या क्रंमाकावर संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget