(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तिघांना अनुज्ञेय रक्कम मंजूर | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तिघांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई ( ११ जून २०१९ ) : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

मेजर सागर प्रकाश परदेशी यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक हे प्रदान करण्यात आले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 12 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 6 लाख रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 6 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

शिपाई खराडे संदीप कैलास यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक हे प्रदान करण्यात आले आहे. शिपाई खराडे संदीप कैलास यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 6 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 75 टक्के म्हणजे 4 लाख 50 हजार रुपये शासकीय अनुदानातून तर उर्वरित 25 टक्के म्हणजेच 1 लाख 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.

लांस नायक साबळे सचिन भिकोबा यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. लांस नायक साबळे सचिन भिकोबा यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 23 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या मार्फत लांस नायक साबळे सचिन भिकोबा यांना ही रक्कम देण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget