(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम | मराठी १ नंबर बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम

मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

मुंबई ( १३ जून २०१९ ) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत.

स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण आणि वैद्यकीय क्षेत्रात योगाचे महत्त्व आणि त्याचा अवलंब याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासन विचाराधीन असून छत्तीसगढ आणि हरियाणा राज्यांनी निर्माण केलेल्या योग आयोगाचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील 177 देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. योगाला आता वैद्यकीय चिकित्सा व जीवनपद्धतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget