मुंबई ( ७ जून २०१९ ) : बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक मानले जाणाऱ्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी ६० कोटी ५० लाख रुपयांच्या विकास आराखड्याला वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल तत्त्वतः मंजुरी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या आराखड्यातील विकासकामे उत्कृष्ट दर्जाची असावीत आणि जलद गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले की, विकास आराखड्यात भक्त निवास बांधण्यासाठी १ कोटी ८० लाखाची तरतूद करण्यात आली होती. मात्र भाविकांच्या गर्दीचा लक्ष्यांक लक्षात घेऊन यात नव्याने १० कोटी निधीची तरतूद करण्याचे सांगण्यात आले आहे. आराखड्याच्या अमलबाजवणी साठी पहिल्या टप्प्यात 24 कोटी 99 लाख रुपयांचा निधी देताना १० कोटी रुपयांचा निधी हा तातडीने वितरीत करण्याचे आदेश ही आज त्यांनी दिले. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकास आराखड्यातील कामांचे वेळापत्रक तयार करून कालबद्ध रीतीने ती पूर्ण करावीत असे ही त्यांनी सांगितले.
श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील मंदिर हे अतिशय प्राचीन आहे त्यामुळे येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येथे येणाऱ्या लाखो भाविकांची कुठलीही गैरसोय होता कामा नये, शिवाय त्यांना इथे आल्यावर प्रसन्न वाटेल, समाधान वाटेल असे काम करावे, अशी भावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा