(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित - पर्यावरण मंत्री रामदास कदम | मराठी १ नंबर बातम्या

प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित - पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई ( १५ जून २०१९ ) : मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून गतीने कामे सुरु असून, भविष्यात मुंबई शहर पुरापासून सुरक्षित राहील, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हॉटेल ताज पॅलेस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, युवानेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. कदम म्हणाले, मिठी नदी 18 किमी लांब असून आत्तापर्यंत सात फूट 16 किमी पर्यंत खोलीकरण केले आहे. 20 मिटरपासून 100 मिटरपर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या परिसरात जवळपास पाच हजार झोपड्या होत्या. त्यापैकी 4 हजार 388 झोपड्या हटविल्या आहेत.

झोपडपट्ट्यांचे सांडपाणी, प्लास्टिक, कचरा थेट मिठी नदीत येत असल्याने प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढले होते. प्लास्टिक कचऱ्यामुळे पाणी तुंबत असल्याने या भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होत होती. गेल्या चार वर्षामध्ये प्रदूषणमुक्त नदी करण्याकडे मोठी मोहीम राबविल्याने पुराची भीती दूर झाली आहे.

या नदीच्या दोन्ही बाजुने संरक्षक भिंत बांधली असून मल-जल वाहिन्या टाकल्या आहेत. असे सांगून कदम म्हणाले, नदीच्या भरती प्रवण क्षेत्रात समुद्राचे पाणी येऊ नये म्हणून बंधारा बांधण्यात येणार आहे. आजुबाजुच्या नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी पाच पुलांचे बांधकाम केले असून वाहतूकही सुरु झाली आहे. अन्य ठिकाणच्या चार पुलांची कामे प्रगतीपथावर आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले, स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन काम करीत आहे. मुंबईला पुरापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून मिठी नदीचे शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी स्वत:हून नदी-नाल्यात प्लास्टिकच्या वस्तू, घरातील कचरा टाकू नये. सांडपाणी सोडू नये म्हणून जनतेचे प्रबोधन करण्यावर भर देत आहोत, असेही ठाकरे यांनी सांगितले. प्रारंभी प्रशांत गांगुर्डे यांनी मिठी नदीच्या सादरीकरणातून सुरु असलेल्या व झालेल्या कामांची माहिती दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget