(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); रत्नागिरी जिल्ह्यातील 8 तलावांच्या संवर्धनांसाठी 3 कोटी 85 लाखांचा निधीं वाटप | मराठी १ नंबर बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील 8 तलावांच्या संवर्धनांसाठी 3 कोटी 85 लाखांचा निधीं वाटप

मुंबई ( ४ जून २०१९ ) : पर्यावरण विभागातर्फे राष्ट्रीय तलाव सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 8 गावातील तलावांच्या संवर्धनासाठी 3 कोटी 85 लाख 26 हजारांचा निधी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते आज मंत्रालयात वितरित करण्यात आला.

हा निधी तलावातील गाळ काढणे, खोलीकरण करणे, दगडाचे पिचींग करणे, झाडे लावणे, गार्डन तयार करुन नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह बांधणे, वॉकिंग ट्रँक तयार करणे, आदी कामासाठी वापराला जाणार आहे. हा तलाव संवर्धन निधी सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिरखल तलाव, दापोली, शिरशिंगे तलाव, दापोली, संवेणी तलाव, खेड, विन्हे तलाव, मंडणगड, उत्तरेश्वर तलाव, दहागाव, घेरासुमारगड, खेड, आणि विष्णू तलाव, लोणेरे - गोरेगाव (माणगाव)
येथील तलावासाठी निधींचे वितरण करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ब्रिटिश कालीन तसेच पुरातन असलेले तलाव प्रदूषण मुक्त तसेच सुशोभित होणार आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget