(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबईत ॲण्टीरेबीज लसीचा तुटवडा नाही - योगेश सागर | मराठी १ नंबर बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबईत ॲण्टीरेबीज लसीचा तुटवडा नाही - योगेश सागर

मुंबई ( २१ जून २०१९ ) : बृहन्मुंबई महानगरपालिकेस मे. भारत बायोटेक या कंपनीमार्फत दोन वर्षांपासून ॲन्टीरेबीज लसीचा पुरवठा नियमितपणे करण्यात येतो. गुणवत्ता पात्रतेसाठीच्या प्रक्रियेमुळे ॲण्टी रेबीज लसीचा पुरवठा करण्यास विलंब झाला होता. मात्र, लसीचा तुटवडा कोणत्याही इस्पितळात नव्हता. संबंधित पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी सांगितले.

विधानसभेत मुंबई व उपनगरातील रूग्णालयांमध्ये ॲन्टीरेबीज लस उपलब्ध नसल्याबाबत सदस्य मिलिंद माने यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना ते बोलत होते.

सागर म्हणाले, भारत बायोटेक या कंपनीमार्फत ॲण्टीरेबीज लसीचा पुरवठा शहरातील ११६ डिस्पेन्सरीमध्ये गेली दोन वर्षे करण्यात येतो. लसीचा पुरवठा करण्यास विलंब झाला असला तरी, तुटवडा शहरात कधीही नव्हता. संबंधित पुरवठा करण्यास विलंब केलेल्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. ॲण्टीरेबीज लसीचा तुटवडा असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही सागर यांनी यावेळी दिली. यावेळी सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, दिलीप वळसे पाटील, अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget