(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लोणार सरोवराच्या समस्यांबाबत समिती स्थापणार - सुधीर मुनगंटीवार | मराठी १ नंबर बातम्या

लोणार सरोवराच्या समस्यांबाबत समिती स्थापणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई ( २८ जून २०१९ ) : लोणार येथील सरोवराच्या समस्यांबाबत स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. जलसंधारणासंदर्भातील त्यांच्या सुचना तांत्रिक दृष्ट‍िकोनातून तपासून अंमलबजावणी करण्यासाठी निधी कमी पडणार नाही. वृक्षतोडीसंदर्भात जे अधिकारी जबाबदार आहेत ते चौकशीअंती दोषी आढळल्यास पुढील सहा महिन्यात निलंबन करण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.

बुलढाणा येथील लोणार येथे अशनीपातामुळे निर्माण झालेले जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असून यातील पाणी झपाट्याने घटत असल्यासंदर्भात सदस्य संजय रायमुलकर यांनी लक्षवेधी मांडली. त्यास उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, लोणार सरोवरातील झऱ्यांचा व पर्यावरणीय प्रश्नासंदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत २०१७-१८ मध्ये भूभौतिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये भूपृष्टीय भागापासून ते खोलवर भूशास्त्रीय अभ्यास करून सुद्धा लोणार सरोवर परिसरातील झऱ्यांचा उगम अथवा झऱ्यांना पाणीपुरवठा करणारे स्त्रोत निश्चित करता आले नाही. तरी, स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापून, सरोवरातील पाण्याच्या स्त्रोतासंदर्भात अहवाल मागविण्यात येईल. वन तोडीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget