मुंबई, दि. 20; गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी जमीन अधिग्रहित करतांना त्यात गैरव्यवहार झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे, या प्रकरणाची एक महिन्याच्या आत चौकशी पुर्ण करू असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. आज विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला ते बोलत होते. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री प्रा. अनिल सोले, नागोराव गाणार, धनंजय मुंडे आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.
टिप्पणी पोस्ट करा