(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद लक्षवेधी : अल्पसंख्याकांच्या संस्थांमधील प्रवेशाची आवश्यकता वाटल्यास चौकशी करु - ॲड. आशिष शेलार | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी : अल्पसंख्याकांच्या संस्थांमधील प्रवेशाची आवश्यकता वाटल्यास चौकशी करु - ॲड. आशिष शेलार

मुंबई ( २५ जून २०१९ ) : मुंबईतील अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरीता 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या प्रवेशामध्ये काही अनियमितता असल्याची माहिती घेऊन आवश्यकता वाटल्यास चौकशी करु, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधारपरिषदेत दिली.

अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरीता राखीव जागेवर इतरांचा झालेल्या प्रवेशाबाबतची लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडली होती त्याला उत्तर देताना शेलार बोलत होते.

शेलार म्हणाले, सन 2009-10 पासून मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMR) क्षेत्रात इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरिता 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या 50 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याचे अधिकार संस्था/संबंधित महाविद्यालयास आहेत. यानुसार प्रथमत: संबंधित अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येतो. अल्पसंख्यांक कोट्यातील राखीव असलेल्या जागामधून प्रवेश झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये स्वेच्छेने प्रत्यार्पित (surrender) करण्याची तरतूद आहे. त्यानुसार मुंबईतील जयहिंद महाविद्यालय, के.सी.
महाविद्यालय आणि एच.आर. महाविद्यालय या तीनही महाविद्यालयांनी सदर कोट्याच्या जागा स्वेच्छेने प्रत्यार्पित (surrender) केल्या आहेत. या प्रत्यार्पित केलेल्या जागेवर विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ऑनलाईन
प्रवेश प्रक्रियेमधून प्रवेश दिलेला आहे.

सन 2018-19 साठीच्या इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेवेळी अल्पसंख्यांक समाजाकरिता राखीव ठेवलेल्या कोट्यावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून देण्यात येत असलेल्या प्रवेशाबाबत मा.उच्च न्यायालय, नागपूर खडपीठ येथे रिट याचिका दाखल झालेली होती. यामध्ये उच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रत्यार्पित केलेल्या अल्पसंख्यांक कोट्यातील जागांवर नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर, विद्यार्थी शिल्लक
असल्यास ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून सदर प्रत्यार्पित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असे आदेश दिलेले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता 11 वी प्रवेशाबाबत कार्यवाही करण्यात आली आहे.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, नागोराव गाणार, निरंजन डावखरे, जोगेंद्र कवाडे आदींनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget