मुंबई, दि. 17 : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करुन दिला. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त शिरसागर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगार मंत्री संजय कुटे, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ.परिणय फुके आणि उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांचा मुख्यमंत्र्यांनी परिचय करुन दिला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा