(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); इस्रायलचे राजदूत डॉ. रॉन मालका यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | मराठी १ नंबर बातम्या

इस्रायलचे राजदूत डॉ. रॉन मालका यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई ( २५ जून २०१९ ) : 'जल संवर्धन ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे जल पुनर्वापर तसेच शाश्वत सिंचन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ.रॉन मालका यांनी आज विधान भवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटी दरम्यानच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः हवामान बदलामुळे जल सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी संरक्षित सिंचन सुविधांच्या विकसित करण्यावर आमचा भर आहे. त्यासाठीच मराठवाडा वॉटर ग्रीड संकल्पना लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे प्रयत्न आहेत. त्यामध्ये इस्त्रायलकडील अत्याधुनिक तंत्रज्ञान निश्चितच उपयुक्त ठरू शकेल. ज्यामुळे सिंचनासाठी शाश्वत उपाय योजना उपलब्ध करून देता येतील.'

महाराष्ट्र हे अनेक क्षेत्रांत आघाडीवर असलेले राज्य असल्याचे नमूद करून राजदूत डॉ. मालका म्हणाले, इस्रायल भारताकडे महासत्ता म्हणून पाहतो आहे. उभय देशांदरम्यान तंत्रज्ञान आणि माहितीच्या आदानप्रदानाबाबत सौहार्दाचे संबंध आहेत. ते आणखी वृध्दिंगत व्हावेत असे प्रयत्न आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील जल संवर्धनाच्या प्रयत्नात जल व्यवस्थापन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या संधी आहेत. विशेषतः गोड्यापाण्याची निर्मिती आणि पाणी पुनर्वापर याबाबत व्यापक असे प्रयत्न केले जातील.'

जल व्यवस्थापनासह, कृषी तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही इस्रायल सहकार्य करण्यासाठी उत्सूक असल्याचे डॉ. मलाका यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्याम लाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार, गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, व्हिएसटीएफच्या कार्यकारी संचालक श्र्वेता शालिनी, इस्रायलचे वाणिज्य दूत याकोह फिल्कीन्स्टाईन आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget