(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी तीन जुलै पर्यंत त्रुटींची पुर्तता करावी | मराठी १ नंबर बातम्या

बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनी तीन जुलै पर्यंत त्रुटींची पुर्तता करावी

मुंबई ( २९ जून २०१९ ) : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. यासाठी दिनांक 20 मे 2018 पर्यंत संस्थामार्फत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी काही संस्थेच्या प्रस्तावामध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत संबंधीत संस्थेना कळविण्यात आले आहे.

ज्या संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत अशा ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केलेल्या प्रस्तावापैकी ज्या संस्थांच्या प्रस्तावामध्ये 10 टक्के पेक्षा कमी त्रुटींची आहेत अशा संस्थांनी त्रुटी पुर्तता संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे दिनांक 3 जुलै 2019 पर्यंत सादर करावी. त्यानंतर आलेला प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा‍ ‍महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget