(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सविता चंद्रशेखर या मैदानावर शौचालय, पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुंबई मनपाला निर्देश - योगेश सागर | मराठी १ नंबर बातम्या

सविता चंद्रशेखर या मैदानावर शौचालय, पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुंबई मनपाला निर्देश - योगेश सागर

मुंबई ( २५ जून २०१९ ) : मुंबईतील कुलाबा विभागातील सविता चंद्रशेखर या मैदानावर शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सविता चंद्रशेखर या खेळाच्या मैदानावर शौचालयाची व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता नसल्याची लक्षवेधी सूचना सदस्य भाई जगताप यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना सागर बोलत होते.

सागर म्हणाले, कुलाबा ‘ए’ विभाग येथील सविता चंद्रशेखर हे 12,800 चौ.मी.चे मनोरंजन मैदान असून, सदर मैदान मे.गार्डन स्पोर्टस ॲण्ड रिक्रिएशन सोसायटी यांना सन 1985 पासून देखरेखीकरिता सोपविण्यात आले आहे. ‘ए’ विभागातील कॅपियन्स, सेंट ॲन्स, गार्डन व होलिनेम या शाळांमधील तसेच स्थानिक मुले व मुली यांचेकडून सदर मैदानाचा वापर खेळाकरिता करण्यात येतो.

या मैदानावर ऑस्कर फाऊंडेशन यांना तीन वर्षाकरिता सध्याच्या व्हॉलीबॉल कोर्टवर 20 मीटर X 40 मीटर आकाराचे फुटबॉल टर्फ (सन 2022 मधील फुटबॉल वर्ल्डकप पर्यंत) उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत परवानगी देण्यात आली आहे. सदर परवानगी देताना या टर्फचा वापर कोणतेही
शुल्क न आकारता सर्वांना उपलब्ध असेल अशी अट घालण्यात आली आहे. तसेच ऑस्कर फाऊंडेशनतर्फे तेथे तात्पुरत्या स्वरुपात चेंजिंग रुम तसेच शौचालय उभारण्याची अट घालण्यात आली आहे. तथापि, ही सुविधा कायमस्वरुपी असणार नाही. ऑस्कर फाऊंडेशनतर्फे ही सुविधा सीएसआर फंडातून करण्यात येणार असल्याने येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करुन देण्याबाबतची अट त्यांचेशी झालेल्या करारात समाविष्ट करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेस सूचना देण्यात येत आहेत. या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget