मुंबई ( ११ जून २०१९ ) : मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीमार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आणि पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना यासाठी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका अथवा नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना व डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना या दोन्ही योजनेंतर्गत सन २०१९-२० करिता शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पूर्तता करत असतील, अशा सर्व अल्पसंख्याक शाळा व मदरशांचे प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - 400001 यांचेकडे पाठवावा. याशिवाय अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३१ ऑगस्ट २०१९ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन समितीमार्फत कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा