(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कराड-चिपळूण महामार्गाचे काम गतीमान करणार - चंद्रकांत पाटील | मराठी १ नंबर बातम्या

कराड-चिपळूण महामार्गाचे काम गतीमान करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई ( २८ जून २०१९ ) : पावसाळी परिस्थिती लक्षात घेता आणि कोणतेही अपघात घडू नये यासाठी कराड- चिपळूण या महामार्गाचे काम गतीमान करण्यात येईल. या मार्गाचे रूंदीकरणाचे काम अपूर्ण राहिल्यासंदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आज विधानसभेत शंभुराज देसाई यांनी कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, कराड-चिपळूण महामार्गाचे काम तातडीने करण्यात येणार असून निविदेचा कार्यकाळ ४५ दिवसावरून ७ दिवसांचा करून कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच शाहुवाडी येथील कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या परवानगीनंतर कामास सुरूवात करण्यात येणार आहे. जुळेवाडी खिंडीतील पुलाची दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही पाटील यांनी आज दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget