(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानसभा निवेदन : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मासिक पासाची 79 कोटी 41 लाख 42 हजाराची सवलत - परिवहन मंत्री दिवाकर रावते | मराठी १ नंबर बातम्या

विधानसभा निवेदन : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मासिक पासाची 79 कोटी 41 लाख 42 हजाराची सवलत - परिवहन मंत्री दिवाकर रावते

मुंबई ( २१ जून २०१९ ) : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्याथ्याना एसटीच्या नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीच्या मासिक पासाची ७९ कोटी ४१ लाख ४२०९९ इतक्या रकमेची सवलत दिली असून, २०,७८,८१० विद्याथ्यानी लाभ घेतला. विद्यार्थ्यांची ३३.३३ टक्के शैक्षणिक शुल्काची रक्कम माफ करण्यात आली असून राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानसभेत निवेदन सादर करताना दिली.

रावते म्हणाले, सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात तीव्र पाणीटंचाई असल्याने परिवहन महामंडळाकडे दुष्काळग्रस्त ९ जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १९ गावांना पाणीपुरवठा करण्यात आला.

यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर व बुलढाणा या जिल्ह्यात महामंडळाच्या अखत्यारित असणाऱ्या बसस्थानकातील विहिरींमधून तसेच नांदेड व नाशिक येथे एम.आय.डी.सी. मधून आणि परभणी व हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयांकडून पाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहितीही रावते यांनी यावेळी दिली. याचबरोबर, दुष्काळसदृष्य भागातील औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांमध्ये रिक्त चालक तथा वाहक पदाची सरळसेवेने भरती करण्याबाबातचा निर्णय घेण्यात आला आहे. या भरतीत दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील तसेच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही रावते यांनी यावेळी सांगितले. पावसाची अनिश्चितता व त्यातून निर्माण होणारी पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या वन खात्याने वृक्ष लावण्याबाबत निश्चीत केलेल्या धोरणानुसार २७,००० वृक्षारोपन केले असून, या वर्षी ५०,००० वृक्षारोपन करण्याचे ध्येय ठरवले असल्याची माहिती रावते यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget