(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मत्स्यव्यवसाय : १५ दिवसात धोरण जाहीर करणार - महादेव जानकर | मराठी १ नंबर बातम्या

मत्स्यव्यवसाय : १५ दिवसात धोरण जाहीर करणार - महादेव जानकर

मुंबई ( २८ जून २०१९ ) : रत्नागिरी सागरी जलधी क्षेत्रात दोन मासेमारी चिनी नौका आढळून आल्या. या आंतरराष्ट्रीय बोटी केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असल्याने तटरक्षक दलाकडून कार्यवाही सुरू आहे. स्थानिक मच्छिमारांच्या सुरक्षेच्या आणि व्यवसायाच्या अनुषंगाने मत्सव्यवसायाबाबत पुढील १५ दिवसात धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती पदुम मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानसभेत सांगितले.

समुद्रात मच्छिमारी बंद असताना विदेशी बोटी आढळल्यासंदर्भात सुभाष पाटील यांनी लक्षवेधी मांडली. त्यास उत्तर देताना जानकर बोलत होते.

जानकर म्हणाले, चिनी १० नौकांपैकी ४ नौका या दाभोळ येथे बंदर खात्याच्या अखत्यारित आहेत. उर्वरित ६ नौका या तटरक्षक दल या विभागाच्या अखत्यारित आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभाग, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विभाग, कस्टम विभाग, सागरी पोलीस इत्यादींनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget