(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वसतीगृह प्रवेशासाठी शासकीय वसतीगृह वरळीला अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

वसतीगृह प्रवेशासाठी शासकीय वसतीगृह वरळीला अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुलांचे शासकीय वसतीगृह, वरळी, 118, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृह, वरळी, 116 व संत मीराबाई मुलींचे वसतीगृह, वरळी,116 या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात वसतीगृहातून अर्ज प्राप्त करुन घेऊन परिपूर्ण अर्ज भरुन वसतीगृहात जमा करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची मुदत पुढीलप्रमाणे आहे.

इयत्ता 10 वी व इतर 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) दि.14 जुलै 2019 पर्यंत अर्ज करावा. तसेच पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दि.20 ऑगस्ट 2019 नंतर दि.21 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल. (स्पॉट ॲडमिशन)

बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. अशा इयत्ता 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका/पदवी आणि एम.ए/एम.कॉम/एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) दि. 24 जुलै 2019 पर्यंत अर्ज करावा. तसेच पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहील्यास दि. 24 ऑगस्ट 2019 नंतर दि. 30 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल. (स्पॉट ॲडमिशन)

व्यावसायिक अभ्यासक्रम दि. 28 ऑगस्ट 2019 पर्यंत अर्ज करावा. तसेच पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहील्यास दि.12 सप्टेंबर 2019 नंतर दि.18 सप्टेंबर 2019 पर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्राधान्य देऊन त्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल. (स्पॉट ॲडमिशन) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुला/मुलींसाठी शासकीय वसतीगृह योजना राज्यात राबविण्यात येत आहे. मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय वसतीगृह योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजन, अंथरुण-पांघरुण, ग्रंथालयीन सुविधा, वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रन, डाईंग बोर्ड, बॉयलर सुट व कला निकेतनच्या विद्यार्थ्यांसवाठी डाईंग बोर्ड कॅनव्हास इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी दरमहा 800/- रुपये निर्वाहभत्ता दिला जातो.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget