मुंबई ( २५ जून २०१९ ) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने दुष्काळग्रस्त भागातील 12 जिल्ह्यामध्ये रिक्त चालक तथा वाहक पदासाठी एकूण 4416 पदांसाठी व कोकण प्रदेशातील जिल्हे वगळून इतर 9 जिह्यात 3606 अशा एकूण 8022 चालक तथा वाहक रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांचा गुणवत्ता क्रम लावताना दुष्काळ ग्रस्त जिह्यातील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषद व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
सन 2016-17 मधील चालक तथा वाहक पदाची वाहन चालन चाचणी उत्तीर्ण असलेल्या 945 व किरकोळ त्रुटींचा फेर तपासणीअंती पात्र ठरलेल्या व वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या 878 असे एकूण 1823 उमेदवारांना कोकण प्रदेशा अंतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी निवेदनाद्वारे पुढे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा