(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद लक्षवेधी : अल्पसंख्याक समुहासाठी कल्याणकारी योजना - विनोद तावडे | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी : अल्पसंख्याक समुहासाठी कल्याणकारी योजना - विनोद तावडे

मुंबई ( २१ जून २०१९ ) : राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास होऊन त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याकरीता शासनमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते.

यावेळी तावडे म्हणाले, अल्पसंख्याक समूहाच्या तरुणांना रोजगार वृद्धीकरीता मौलाना आझाद मोफत शिकवणी योजनेंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा तसेच व्यवसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परिक्षा यांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर पोलिस भरतीमध्ये अल्पसंख्याक उमेदवारांना मोठ्या प्रमाणात यश प्राप्त व्हावे याकरीता पोलीस भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण योजना देखील राबविण्यात येते. व्यवसायावर आधारीत प्रशिक्षणाकरीता रोजगाराभिमुख फी-प्रतिपूर्ती योजना, महिला बचतगट योजना तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, मॅंरिट कम मिन्स या योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येतात. तर राज्य शासनामार्फत उच्च व्यावसायिक व इयत्ता 12वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकरीता वसतीगृहे सुरु करण्यात आलेली असून त्यापैकी राज्यात 19 ठिकाणी मुलींसाठी वसतीगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. तर 9 ठिकाणी वसतीगृहाचे काम सुरु आहे. त्याचबरोबर मुलांकरीता 6 ठिकाणी वसतीगृहांचे काम सुरु करण्यात आलेले आहेत. या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग, शरद रणपिसे, हेमंत टकले, जोगेंद्र कवाडे आदींनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget