(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); आंतरराष्ट्रीय योगदिनास मंत्रालयात उत्स्फूर्त प्रतिसाद | मराठी १ नंबर बातम्या

आंतरराष्ट्रीय योगदिनास मंत्रालयात उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई ( २१ जून २०१९ ) : पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज महाराष्ट्र शासन व योग संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात योग दिन साजरा झाला. या योगदिनास मंत्रालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पदूम मंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संजय कुटे, गृह राज्यमंत्री (शहरे)डॉ रणजित पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्यने योगा कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले, समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मन:शांती आवश्यक असून त्यासाठी योगा करणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेमध्ये काम करताना प्रत्येकाने शारीरिक व मानसिक दृष्टिने तंदुरुस्त राहणे महत्वाचे आहे. धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकांना मानसिक ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठी योगा करणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी सांगितले. योगा संस्थेच्या रुपा व्यांस यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. प्रारंभी योगा संस्थेच्या सचिव डॉ हंसाजी योगेंद्र यांनी योगाचे दैनदिन जीवनातील महत्त्व याविषयी माहिती दिली.त्या म्हणाल्या की,आपले कुठलेही कार्य करण्याअगोदर स्वत:च्या शरिरावर लक्ष केंद्रित करुन पाच मिनिटे डोळे बंद करुन आपल्या श्वासावर लक्ष दिले गेले पाहिजे.त्यानंतरच काम करण्यास सुरवात करावी.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget