मुंबई ( २५ जून २०१९ ) : राज्यातील हवामान, स्थानिक परिस्थिती, पावसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता इत्यादी बाबी लक्षात घेऊन त्यास अनुसरुन अटल आनंदवन घन वन प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज विधान परिषदेत दिली. विपस नियम क्र. 41 अन्वये त्यांनी आज सभागृहाला ही माहिती दिली.
डॉ. फुके पुढे म्हणाले, जगामध्ये सर्वच क्षेत्रामध्ये प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा विकास होत आहे. उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आणि घन वन (Dense Forest) निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरु केला. भारतामध्ये बंगलोर, हैद्राबाद इ. ठिकाणी हा प्रयोग राबविला आहे. आनंदवन, वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील महारोगी सेवा समितीचे जमिनीवर हा प्रकल्प उत्तमरितीने विकसीत केला आहे. या बाबी विचारात घेऊन राज्यामध्ये घन-वन-प्रकल्प 'अटल आनंदवन घन वन प्रकल्प' हाती घेण्याचा निर्णय शासनाने दि .20.6.2019 रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात 2019 मधील पावसाळ्यापासून वृक्ष लागवडीचा 'अटल आनंदवन घन वन प्रकल्प' नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था, शहर विकास प्राधिकरण यांच्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागातील उपलब्ध जागांवर दरवर्षी कार्यान्वित करुन त्यासाठी विविध निधींच्या स्त्रोतांमधून ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश :
• शहरी भागातील जागेची कमतरता विचारात घेऊन छोट्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे.
• रोपवनास जैविक पदार्थ, सेंद्रिय खते, पाणी अशा पुरक संसाधनाची जोड देवून कमी कालावधीत रोपांची चांगली व जलद वाढ साधणे, जिवंत रोपांची टक्केवारी जास्तीत जास्त राखणे.
• शहरी भागात वृक्षराजी वाढवून विविध प्रदूषणांवर नियंत्रण करणे.

टिप्पणी पोस्ट करा