(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘आपलं मंत्रालय’ जूनच्या अंकाचे प्रकाशन | मराठी १ नंबर बातम्या

‘आपलं मंत्रालय’ जूनच्या अंकाचे प्रकाशन

मुंबई ( २५ जून २०१९ ) : ‘आपलं मंत्रालय’ जून महिन्याच्या अंकाचे प्रकाशन अतिथी संपादक तथा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे संचालक (माहिती व प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (वृत्त व जनसंपर्क) सुरेश वांदिले, वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहाय्यक संचालक मंगेश वरकड उपस्थित होते.

आपल्या शरीराला निरोगी बनवणाऱ्या आणि त्याचसोबत मनासही स्वस्थ करणाऱ्या योगाचा जीवनशैलीत स्वीकार प्रत्येक नागरिकाने करायला हवा. अशी संकल्पना जूनच्या अंकातून मांडण्यात आलेली आहे. याचसोबत मॉन्सूनच्या आगमनाचे सर्वच मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. आनंद देणारा, फजिती करणारा असा हा पाऊस आपल्याला ऊर्जा देणारा ठरतो. मात्र, यादरम्यान आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. या सगळ्याच बाबींवर लक्ष केंद्रीत करणारे लेख या अंकात वाचायला मिळतील. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सविस्तर माहितीचा या अंकात समावेश करण्यात आलेला आहे. पावसाळ्यातील वनभ्रमंती या विशेष लेखातून वन पर्यटनाचा निखळ आनंद वाचकांना मिळू शकणार आहे. याशिवाय कविता, व्यंगचित्र यांचा या अंकात समावेश आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget