(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे भरणार - एकनाथ शिंदे | मराठी १ नंबर बातम्या

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे भरणार - एकनाथ शिंदे

मुंबई ( २८ जून २०१९ ) : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची कार्यवाही सुरू असून, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

येथे मुंबईतील राज्य कामगार विमा योजनेतील रूग्णालये आणि औषधांची दुकाने सुरू करण्यासंदर्भात सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, कामगार विमा योजनेअंतर्गत् येणा-या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने बीएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने एका महिन्यात भरती करण्यात येईल. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या रूग्णालयाच्या सुविधात वाढ व्हावी, कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच डॉक्टरांच्या शुल्कात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget