(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मच्छीमारांना आवाहन : अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत | मराठी १ नंबर बातम्या

मच्छीमारांना आवाहन : अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत

11 व 12 जून रोजी मासेमारांनी समुद्रात जाऊ नये.

मुंबई ( ९ जून २०१९ ) : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 व 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील.

हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र काही प्रमाणात खवळलेला दिसेल. या दरम्यान कोकणासह मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळतील, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सुरक्षितेसाठी मासेमारांनी 11 व 12 जून रोजी अरबी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण कोकणात 14 जूनपर्यंत मान्सून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

मान्सूनचे आगमन 8 जून रोजी केरळात झाले आहे आणि 14 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र राज्यातील उर्वरित भागात मान्सूनच्या आगमनाला विलंब होऊ शकतो. 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल आणि काही भागांमध्ये दुपारनंतर मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. राज्यातील बहुतांश भागात किमान 15 जूनपर्यंत तरी मान्सूनचे आगमन अपेक्षित नसल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस हा सलग पडत नाही. या काळात तापमान अधिक राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. याचबरोबर, वादळी पावसादरम्यान लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget