(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद लक्षवेधी : मुंबईतील कुलाबा परिसरात पाणी व मुलभूत सुविधा देऊ - योगेश सागर | मराठी १ नंबर बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी : मुंबईतील कुलाबा परिसरात पाणी व मुलभूत सुविधा देऊ - योगेश सागर

मुंबई ( २० जून २०१९ ) : मुंबईतील कुलाबा येथील महापालिकेच्या अ विभागातील भागात नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी व इतर मुलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले असल्याची, माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

मुंबईतील कुलाबा येथील महापालिकेच्या अ विभागातील भागात नागरिकांना जाणवणाऱ्या पाणी टंचाईबाबतची लक्षवेधी सूचना ॲड.राहुल नार्वेकर यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना सागर बोलत होते. सागर म्हणाले, कुलाबा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथील मुख्य जलवाहिनीपासून हेलीपॅड गल्लीत साईबाबा मंदिरापर्यंत 300 मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. ‘अ’ विभागातील आझाद मैदान येथील टँकर फिलींग पॉईंट येथे टँकर भरुन त्याद्वारे आवश्यकतेनुसार कुलाबा परिसरात पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. या टँकर फिलिंग पॉईटवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व जलमापक यंत्रे बसविण्यात आली असून, त्याद्वारे टँकरमध्ये भरण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यात येते.

मुंबईतील झोपडपट्टी विभाग, शासकीय/महानगरपालिका रुग्णालये आणि इतर आवश्यक ठिकाणी गरजेनुसार महानगरपालिकेमार्फत टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने कळविले आहे. महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्यांवर जलमापक यंत्रे बसविण्यासाठी प्रयत्न करु. तसेच पाण्याची चोरी व गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या नागरिकांना नळ जोडणी मिळाली नसेल त्यांना अर्ज केल्यानंतर 30 दिवसात नळ जोडणी देण्याचे आदेश मनपाला देण्यात येतील.

या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, हरिभाऊ राठोड, प्रवीण दरेकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. मनिषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget