(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राज्यात 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची गुंतवणूक | मराठी १ नंबर बातम्या

राज्यात 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची गुंतवणूक

देशात सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप महाराष्ट्रात

नवी दिल्ली ( २८ जून २०१९ ) : ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

या योजनेंतर्गत देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्राने आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्यात एकूण 68 स्टार्टअप मध्ये 440 कोटी 38 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक झाली आहे.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणा-या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) 24 जून 2019 रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्र शासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांसह महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

या यादीत महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (2,847), दिल्ली (2,552), उत्तरप्रदेश (1,566) तर 1 हजार 80 स्टार्टअप सह तेलंगना पाचव्या स्थानावर आहे.

वैकल्पिक गुंतवणूक निधीत महाराष्ट्र दुस-या स्थानावर

लघु उद्योग विकास बँकेने (सीडबी) भांडवली बाजारावर देखरेख ठेवणा-या ‘सेबी’ संस्थेकडे नोदंणीकृत संस्थांच्या माध्यमातून स्टार्टअप उद्योगांसाठी वैकल्पिक गुंतवणूक निधी उभारला आहे. या निधीच्या माध्यमातून देशभरात 13 राज्ये आणि दिल्ली या केंद्र शासीत प्रदेशात 247 स्टार्टअप उद्योगांत 1 हजार 625 कोटी 73 लाखांची वैकल्पिक गुंतवणूक केली आहे. या यादीत महाराष्ट्र 68 स्टार्टअप मधील 440 कोटी 38 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस दुस-या स्थानावर आहे. तर 75 स्टार्टअप मधील 499 कोटी 85 लाखांच्या वैकल्पिक गुंतवणुकीस कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे.

स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत स्टार्टअप उद्योग उभारण्यासाठी ‘फंड ऑफ फंड फॉर स्टार्टअप’ (एफएफएस) नावाने 10 हजार कोटींचा निधी उभारला आहे. उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग देशातील स्टार्टअप उद्योगांवर देखरेख ठेवतो तर लघु उद्योग विकास बँक (सीडबी) ही स्टार्टअप उद्योगांना वितरीत करावयाच्या ‘फंड ऑफ फंड फॉर स्टार्टअप’ संदर्भातील संवितरण संस्था आहे.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात ही माहिती दिली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget