नवी दिल्ली ( २१ जून २०१९ ) : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. कस्तुरबागांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या हिरवळीवर आज सकाळी ‘योग दिनाचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, विजय कायरकर, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी –कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी मंचावर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योग प्रशिक्षके आकृती राणा आणि संस्थेचे विद्यार्थी कृष्णा आर्य यांनी महत्वपूर्ण योगासनांची माहिती दिली व प्रात्यक्षिक करुन दाखविली. योगासनाचे महत्व पटवून देताना आकृती राणा यांनी योगासनाचे फायदेही समजावून सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा