(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विषयरचना, मूल्यमापन अभ्यासासाठीच्या समितीचा 10 दिवसात अहवाल - ॲड. आशीष शेलार | मराठी १ नंबर बातम्या

विषयरचना, मूल्यमापन अभ्यासासाठीच्या समितीचा 10 दिवसात अहवाल - ॲड. आशीष शेलार

मुंबई ( ९ जुलै २०१९ ) : शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून ही समिती 10 दिवसांत अहवाल सादर करणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी दिली.

राज्य मंडळांतर्गत मूल्यमापन बंद करण्यात आले होते. मात्र सी.बी.एस.ई व आय.सी.एस.ई अशा इतर अन्य मंडळामध्ये विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन सुरु आहे. त्यामुळे सी.बी.एस.ई व आय.सी.एस.ई आणि राज्य मंडळाच्या विषय योजना, मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून ही समिती 10 दिवसात अहवाल सादर करणार आहे. सदर अहवाल विचारात घेऊन 9 ते 12 पर्यंत विषय रचना व मूल्यमापन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.

विद्या प्राधिकरणाचे संचालक, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव, माध्यमिक शिक्षण संचालक, बालभारतीचे संचालक आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष या समितीचे सदस्य असतील.

याशिवाय डॉ. विष्णू वझे, किशोर चव्हाण, मनीषा महात्मे, रमेश देशपांडे, डॉ. अरुणा सावंत, एन.डी.पाटील, डॉ. नरेंद्र पाठक, डॉ. ज्योती गायकवाड, पी.एल.पवार, सुचेता नलावडे, हिना समानी हे उच्च माध्यमिकसाठी सदस्य म्हणून तर, वैशाली पोतदार, अपर्णा कुलकर्णी, हेमंत पुजारी, जयश्री काटीकर, तिलोत्तमा रेड्डी, मोहन शेटे, नागेश माने, गिता बोधनकर, ॲना कोरिया, अंकुश महाडीक, विकास गरड हे माध्यमिकसाठी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget