(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. 20 : माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

मुंबई शहराच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांनी शैक्षणिक वर्ष 2018 -19 मध्ये दहावी आणि बारावी, डिप्लोमा आणि पदवी परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण
मिळवून उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.शिष्यवृत्ती मिळण्याकरिता 15 ऑक्टोबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई -01 येथे अथवा 022- 22700404 यांच्याशी संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget