(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध | मराठी १ नंबर बातम्या

भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध

मुंबई ( ६ जुलै २०१९ ) : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१८-१९ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, महालेखाकर (लेखा व हकदारी)I महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्यासाठी संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत. संबंधित वर्गणीदारांनी आपली भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून घ्यावीत, असे आवाहन महालेखाकार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या वार्षिक लेखा विवरणपत्रात जर काही त्रुटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट किंवा डेबिट दर्शविले असेल तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदाराची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरणपत्रात नमूद केली नसेल त्यांनी त्याचा तपशील स्वत:च्या कार्यालयातील आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरित महालेखाकार कार्यालयाला कळवावा, म्हणजे त्यात योग्य ती सुधारणा करून देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे जून २०१९ पासून इंटरनेटवरही वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी वेबसाईटचा पत्ता http://agmaha.cag.gov.in असा आहे असेही महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget