(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); खरीप हंगाम 2019 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ | मराठी १ नंबर बातम्या

खरीप हंगाम 2019 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 29 : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता यावे यासाठी योजनेला मुदतवाढ दिली आहे. दि. 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याचे
आवाहन कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे.

या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै अशी होती. ही मुदत वाढवून दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती. तथापि, शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज पुन्हा दोन दिवसांसाठी योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget