मुंबई ( ८ जुलै २०१९ ) : मुंबई, दि.8 : सोलापूर जिल्ह्यातील होटगी येथे औष्णिक विद्युत प्रकल्पाकरिता आहेरवाडी, होटगी, तिल्हेहाळ या गावकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. स्थानिक लोकांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मोबदला देण्यात यावा. असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.
आज मंत्रालयात या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर संबंधित अधिकारी उपस्थित होते
देशमुख म्हणाले की, या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची एनटीपीसी यांनी दक्षता घ्यावी स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांना या प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून द्यावा,तसेच पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी आणि या गावातील ज्या मजुरांना मोबदला मिळाला नाही त्यांची एकत्रित यादी तत्काळ तयार करावी आणि मजुरांना मोबदला देण्यात यावा. तसेच स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार निर्मिती संदर्भातील प्रस्ताव तयार करावेत लोकांच्या हाताला काम मिळेल असे व्यवसाय उभे कसे करता येथील याकडे लक्ष द्यावे. त्याच बरोबर स्थानिक गावकऱ्यांना आपल्या अडचणी सांगता याव्यात त्यासाठी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी एक विशेष कक्ष तयार करून गावकऱ्यांची संवाद साधावा असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा