(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वसई विरार महापालिकेने जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन द्याव्यात - पालकमंत्री रवींद्र चव्हाण | मराठी १ नंबर बातम्या

वसई विरार महापालिकेने जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन द्याव्यात - पालकमंत्री रवींद्र चव्हाण

पालघर, दि. 11- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल माध्यमाद्वारे पारदर्शकतेने काम करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार वसई विरार महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात असे सांगून शासन आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास सर्वांगीण विकासाची गती वाढविणे सहज शक्य होईल, असा विश्वास पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय विकास कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. आज पहिल्या बैठकीत त्यांनी वसई तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, महापालिका आयुक्त बी.जी. पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त सागर, अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने यावेळी विकासकामांचे सादरीकरण करण्यात आले.

चव्हाण यांनी विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर उपयुक्त सूचना केल्या. केमिकलमुळे आग लागल्यास ती विझवण्यासाठी काय उपाययोजना आहेत याची माहिती घेऊन त्यांनी यासाठी वापरली जाणारी फोम यंत्रणा सर्व केमिकल कंपन्यांमध्ये ठेवण्याबाबत त्यांना पत्र लिहिण्याचे निर्देश दिले. पाणी पुरवठ्याचा आढावा घेताना रहिवाशांना प्रभागनिहाय किती पाणी उपलब्ध आहे ते जाहीर करून पाण्याच्या कनेक्शनसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा तात्काळ सुरू करावी असे सांगितले. त्यांनी स्वतः यासाठी उपलब्ध असलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या फॉर्मची चाचणी घेतली. नगरविकासाचे आराखडे सकारात्मक भूमिकेतून पूर्ण करावेत, त्यातून महापालिकेचा महसूल देखील वाढेल असे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवेची माहिती घेताना खाजगी डॉक्टरांची सेवा महापालिकांच्या रुग्णालयात उपलब्ध होईल का ते पाहावे, अशी सूचना त्यांनी केली. रस्त्यांचा आढावा घेऊन जेथे अपघात होऊ शकतात तेथे सूचनांचे बोर्ड लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. रहिवाशांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget