(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यात शुभारंभ | मराठी १ नंबर बातम्या

राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यात शुभारंभ

मुंबई ( २८ जुलै २०१९ ) : राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते आज करण्यात आला. 28 जुलै या जागतिक हिपेटायटिस दिनाचे औचित्य साधून हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व जिल्हा रुग्णालयात हिपेटायटिस तपासणी व उपचार सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार कॅप्ट. आर तमिल सेल्वन उपस्थित होते.

दरम्यान, हिपेटायटीस बद्दल अधिकृत माहिती व रुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून टोल फ्री क्रमांक १८००-११-६६६६ आज पासून सर्वत्र कार्यान्वित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या क्रमांकावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी स्वतः फोन करून उपचार व सेवेबाबत माहिती घेतली.

*एकत्रित प्रयत्नांनी हिपेटायटिस वर नियंत्रण मिळवूया*

भारतात सुमारे चार कोटी हिपेटायटिस बी तर जवळपास 60 लाख ते 1.2 कोटी हिपेटायटिस सी चे रुग्ण असल्याचा अंदाज आहे. या रुग्णांना यकृत संबंधित आजार व कर्करोग होण्याचा मोठा धोका संभवतो. राज्यात हिपेटायटिसच्या उपचारासाठी पुरेसा साठा उपलब्ध असून सायन मधील लोकमन्य टिळक मनपा रुग्णालय संदर्भित सेवा देण्यासाठी केंद्र बिंदू असणार आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व जनतेच्या सहकार्यामुळे आपण देशातून पोलिओ चे उच्चाटन करण्यास यशस्वी झालो आहोत. त्याचप्रमाणे राज्याचा आरोग्य विभाग, केंद्र शासन, महागरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नांनी व जनतेच्या सहकार्याने आपण हिपेटायटिस वर नियंत्रण मिळविण्यास देखील नक्की यशस्वी होऊ असा विश्वास आरोग्यमंत्री शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

*जागरूकता, प्रतिबंध, निदान, उपचाराच्या माध्यमातून हिपेटायटिस निर्मूलनाची देशव्यापी चळवळ*

भारतात महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्ये मोफत निदान, उपचार व औषधे असा हिपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून उर्वरित सर्व राज्यांमध्ये देखील लवकर याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

समूळ उपचार करून २०३० पर्यंतचे हिपेटायटिस निर्मूलनाचे ध्येय गाठण्यासाठी भारत जगात अग्रस्थ आहे. हे लक्ष्य २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून यासाठी देशात जागरूकता, प्रतिबंध, निदान, उपचार या माध्यमातून मोठी देशव्यापी चळवळ सुरू करण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौब यांनी यावेळी सांगितले. व ते पुढे म्हणाले, अलीकडेच राज्यात झालेल्या हिपेटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जेष्ठ सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ते स्वतः हिपेटायटिसग्रस्त असल्याचे सांगून रुग्णांप्रति आपण अधिक संवेदनशील असणे आवश्यक असल्याचे सांगितले. देश हिपेटायटिस मुक्त करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असून महाराष्ट्र शासनाने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकस्पद आहे.

कार्यक्रमात हिपेटायटीस नियंत्रण चित्र प्रदर्शनाचे व हिपेटायटिस ट्रेनिंग मॉडल सेंटरचे उदघाटन करण्यात आले. तसेच हिपेटायटीस नियंत्रण कार्यक्रमात रुग्णांची माहिती व त्यांना दिलेली सेवा याची माहिती जतन करून ठेवण्यासाठी प्रोग्रॅम मानजमेंट सिस्टम तयार करण्यात आले असून त्याचे व त्याच्या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण सहसचिव विकास शिल, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभाग सचिव डॉ संजीव मुखर्जी, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रमोद इंगळे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी हेंक बेकेडाम यांच्यासह केंद्र शासन व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget