मुंबई ( १६ जुलै २०१९ ) : राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समुहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत राज्य सरकारकडून देऊ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पतंजली उद्योग समूहाला औसा, जि. लातूर येथील जमीन चार दिवसांत देण्यात आली या बातमीत काहीही तथ्य नाही. तसेच पतंजली उद्योग समुहाला अद्याप जमीन देण्यात आलेली नाही, असा खुलासा राज्य शासनाने केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा