(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बस स्थानकाच्या नुतणीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक | मराठी १ नंबर बातम्या

बस स्थानकाच्या नुतणीकरणासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक


यवतमाळ, दि. 11 : राज्यभरात बस स्थानकांच्या नुतणीकरणासाठी शासनाने अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून दिला आहे. यवतमाळ शहरातील बस स्थानकाचेसुध्दा नुतणीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी, यवतमाळ आगार प्रमुख अविनाश राजगुरे, परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंता शीतल गोंड, नगरविकास विभागाचे सहाय्यक संचालक किरण राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत मरपल्लीकर, नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासनाने राज्यातील बस स्थानकांच्या नुतणीकरणासाठी 600 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यवतमाळ बसस्थानकाचा यात समावेश आहे. कंत्राटदाराला 11 महिन्यात हे बसस्थानक पूर्ण करावयाचे आहे. मात्र परिवहन विभागाकडून संथगतीने काम सुरू आहे. परिवहन महामंडळाने ठराविक कालावधीत काम करावे. शहरातील बसस्थानक दुस-या जागेवर स्थलांतरीत करण्यासाठी जागेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जेणेकरून बस स्थानक स्थलांतरीत झाल्यावर नुतणीकरणाच्या कामाला सुरवात करता येईल. जनतेच्या सोयीकरीता येथील बस स्थानक त्वरीत तयार करण्याला प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बस स्थानकाच्या डिझाईनबद्दल सादरीकरण करण्यात आले. बैठकीला
संबंधित कंत्राटदार तसेच परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget