यवतमाळ ( २७ जुलै २०१९ ) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदी अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 7 ऑगस्ट पर्यंत जमावास बंदी राहणार आहे. या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (1) व 37 (3) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकांद्वारे कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा