(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची 29 जुलैला प्रसिद्धी | मराठी १ नंबर बातम्या

विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची 29 जुलैला प्रसिद्धी

मुंबई ( २६ जुलै २०१९ ) : विविध जिल्ह्यांतील 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 29 जुलै 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, यात 1 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 48; तर नवनिर्मित 17 अशा एकूण 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ही मतदार यादी तयार करण्यात येत आहे. विधानसभा मतदार संघाच्या 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 29 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 29 ते 31 जुलै 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 1 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget