(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या

सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार

यवतमाळ ( २७ जुलै २०१९ ) : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्‍त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना अशा कार्यालयाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ एक रकमी 10 हजार रूपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रूपयांचा पुरस्कार सैनिक कल्याण विभागामार्फत दिला जातो. यासाठी पात्र असणाऱ्यांनी आपले अर्ज संबंधीत कागदपत्रासह 15 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे पाठवावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 07232-245273 वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget