(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); हृदय प्रत्यारोपण झालेल्या धनश्री मुजमुलेच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा हजारांचे योगदान | मराठी १ नंबर बातम्या

हृदय प्रत्यारोपण झालेल्या धनश्री मुजमुलेच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा हजारांचे योगदान

मुख्यमंत्री वाढदिवसाच्या निमित्ताने आवाहनाला प्रतिसाद

मुंबई ( २३ जुलै २०१९ ) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक आर्थिक दुर्बलांसाठी मोठा आधार ठरतो. यातून नवजीवन मिळालेल्यांकडून याच निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने योगदान मिळणे म्हणजे आगळी संवेदनशीलता ठरते आहे. या निधीमुळे हृदय प्रत्यारोपण झालेल्या जालना येथील धनश्री मुजमुलेच्या कुटुंबियांनी याच निधीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे योगदान दिले.

धनश्री मुजमुले, तिचे वडील कृष्णा, आई कल्पना यांच्यासह कुटुंबियांनी निधीचा हा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवशी खर्चाला फाटा देऊन, या निधीत योगदान देण्याचे आवाहन केले त्यासाठी अनेकांकडून योगदान देण्याचा ओघ सुरु झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आज दुसऱ्या दिवशीही वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरुच होता. यातच आज धनश्रीच्या कुटुंबियांनी या संवेदनशील प्रतिसादाची भर घातली. धनश्री साडेचार वर्षांची असताना, तिच्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतून मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात हृदय प्रर्त्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे पंचवीस लाख रुपयांचा खर्च आला होता. यामुळे नवजीवन मिळालेली धनश्री आता साडेपाच वर्षांची आहे. ती आता शाळेतही जाते, खेळते-बागडते. ज्या निधीमुळे धनश्रीला नवजीवन लाभले, त्या निधीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ऐपती प्रमाणे योगदान देण्याचा निर्धार मुजमुले कुटुंबियांनी केला.

धनश्रीचे वडील कृष्णा मुजमुले म्हणाले, ‘गतवर्षीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या वाढदिवशी निधी देण्याचा प्रयत्न होता. पण काही कारणाने शक्य झाले नाही. पण यंदा प्रयत्नपूर्वक रक्कम जमा केली. यातून अन्य गरजुंनाही मदत व्हावी अशी भावना आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून धनश्रीच्या शस्रक्रियेसाठी भरीव मदत मिळाली. म्हणूनच ती आज हसत-खेळत इथपर्यंत पोहचू शकली आहे. तिच्या शिक्षणासाठी आणि अन्य आरोग्यविषयक गोष्टींसाठी शासनस्तरावरून खूप मोठी मदत मिळाली आहे.’

मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून धनश्रीच्या हस्तेच हा धनादेश स्विकारला आणि तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी वस्त्रोद्योग, पदूम विकास राज्यमंत्री अर्जून खोतकर, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्यासह मुजमुले कुटुंबिय आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget