मुंबई, दि. 8 : परोपकारी कार्य अत्यंत निष्ठेने पूर्ण करणारे आणि वनवासींच्या उन्नतीसाठी सदैव झटणारे ज्येष्ठ समाजसेवी स्वरुपचंद गोयल यांच्या निधनाने एक संपन्न व्यक्तिमत्त्व लोप पावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अखिल भारतीय वनबंधू परिषदेचे सर्वेसर्वा असलेले श्री स्वरुपचंद गोयल यांनी वनवासी क्षेत्रामध्ये केलेल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजसेवेचे नवीन मापदंड निर्माण केले. वनवासी क्षेत्रातील संस्कार केंद्र, एकल विद्यालय, स्वास्थ्य केंद्र, सामाजिक केंद्र यांची स्थापना आणि विस्ताराचे मोठे श्रेय त्यांना जाते. वनवासींना स्वयंपूर्ण करुन त्यांची उन्नती व्हावी, यासाठी ते आयुष्यभर झटले. आपल्यासमवेत समाजातील विविध घटकांनाही त्या कार्यासाठी प्रवृत्त केले. मुंबईत गिरगाव चौपाटीवर आदर्श रामलीला समितीच्या माध्यमातून होणारे रामलीला सादरीकरण आणि राष्ट्रीय कवी संमेलनाच्या प्रवर्तकांपैकी एक म्हणून त्यांची ओळख होती. हरि सत्संग समितीच्या माध्यमातून त्यांनी भारतभर धार्मिक कथांचे आयोजन करतानाच त्याला समाजसेवेची जोड दिली. तब्बल 5 दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजसेवेमध्ये झोकून देत एक आदर्श निर्माण केला.

टिप्पणी पोस्ट करा