(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली | मराठी १ नंबर बातम्या

शीला दीक्षित यांच्या निधनाने परिपक्व राजकीय व्यक्त‍िमत्त्वाचा अस्त - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई ( २० जुलै २०१९ ) : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाने एक कुशल, सहृदयी आणि परिपक्व राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, दीक्षित यांनी सलग तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून कामकाज सांभाळताना दिल्लीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांना जनमानसात विशेष स्थान प्राप्त झाले होते. एक कुशल संघटक आणि प्रशासक हीदेखील त्यांची ओळख होती. महिलांच्या समस्यांविषयी विविध पातळ्यांवर त्यांनी आवाज उठवला. विशेषत: संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिलांविषयक आयोगावर भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी महिलांच्या समस्या जगासमोर प्रखरतेने आणल्या. खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिकांमधूनही त्यांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे राहिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget