(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कामगार विभागातर्फे वृक्षारोपण वृक्षारोपण: सर्व जनतेची चळवळ व्हावी - कामगार मंत्री संजय कुटे | मराठी १ नंबर बातम्या

कामगार विभागातर्फे वृक्षारोपण वृक्षारोपण: सर्व जनतेची चळवळ व्हावी - कामगार मंत्री संजय कुटे

मुंबई ( १ जुलै २०१९ ) : पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने वृक्षलागवड महत्वाची असून हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य सरकारच्या वनविभागाच्या वतिने सुरू केलेली मोहीम सर्व जनतेची चळवळ व्हावी, असे प्रतिपादन कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुटे यांनी आज येथे कले.

कामगार विभागाच्यावतीने ‘एकच लक्ष 33 कोटी वृक्ष’ या मोहिमेअंतर्गत हुतात्मा बाबु गेनू क्रीडा भवन प्रभादेवी रेल्वेस्टेशजवळ वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सुरवातीला कामगार मंत्री संजय कुटे, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, कामगार आयुक्त राजीव जाधव, कामगार विभागाचे सहसचिव महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त महेंद्र तायडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कुटे म्हणाले, वनविभागाच्या वतिने 33 कोटी वृक्षलागवड एक चांगली मोहीम असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे.या माहीमेला जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वनविभागाच्या वतिने सुरू केलेली मोहीम न राहता सर्व जनतेची चळवळ व्हावी.

कामगार विभागाच्या वतिने ही वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवला आसून आजच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर वृक्ष लागवड कार्यक्रमात कामगार विभागाचा मोठा वाटा असेल असेही कुटे यांनी सांगितले.

कामगारासाठी कल्याणकारी योजना राबविणार

कामगार विभागाचा आज ६६ वा वर्धापन दिन आहे. राज्यातील कामगार विभागाचे काम चांगले सुरु आहे.या विभागाच्या वतिने विविध योजना राबविण्यात येतात. येणाऱ्या काळामध्ये लवकरच कामगारांच्या प्रश्नांबाबत नियोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रांमध्ये कामगारांना प्राधन्य दिले गेले पाहिजे तसेच विभागाच्या वतिने कामगारांचे विविध मुलभूत प्रश्न,समस्या सोडवण्यासाठी व त्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असल्याचेही कुटे यांनी सांगितले.

कामगार विभागाचे अवर सचिव सतिश भारतीय, उपायुक्त विश्राम देशपांडे, सुरक्षा रक्षक मंडळाचे राजेश आळे, सहसंचालक (बाष्पके) गजानन वानखेडे, उपसंचालक महेश देशमुख, बंडू इंगळे, के.एस. केंद्रे तसेच कामगार विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget