(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालतचे आयोजन | मराठी १ नंबर बातम्या

अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालतचे आयोजन

मुंबई ( ३१ जुलै २०१९ ) : अखिल भारतीय सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनविषयक तक्रारी ऐकून घेण्यासाठी दि. 23 ऑगस्ट 2019 रोजी मंत्रालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी तक्रारी असल्यास आपल्या विभागास 7 ऑगस्टपर्यंत लेखी स्वरुपात इमेल, फॅक्स किंवा पोस्टाने सादर कराव्यात, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी परिषद सभागृह, 6 वा मजला, मंत्रालय (विस्तार इमारत), मुंबई येथे या पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनविषयक तक्रारी असल्यास भारतीय प्रशासन सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभाग, भारतीय पोलिस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी गृह विभागाकडे तर भारतीय वन सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाकडे दि.7 ऑगस्ट, 2019 पूर्वी सादर कराव्यात. तसेच दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत पेन्शन अदालत मध्ये स्वत: किंवा प्रतिनिधीने तक्रारीसह उपस्थित रहावे, असे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget