(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2018 चा निकाल जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2018 चा निकाल जाहीर

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

मुंबई ( १६ जुलै २०१९ ) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2018 चा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक आनंद बोरा (नाशिक), द्वितीय क्रमांक कृष्णा मासलकर (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक राहूल गुलाणे (यवतमाळ) यांनी पटकावला आहे.

या स्पर्धेत पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी सचिन वैद्य(मुंबई), विरेंद्र धुरी(मुंबई), प्रशांत खरोटे (नाशिक), दीपक कुंभार (कोल्हापूर), गोपाल बोरकर (हिंगोली) यांची निवड करण्यात आली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार तर उत्तेजनार्थ पाच परितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये प्रदान केले जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी राज्याच्या प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 2100 छायाचित्र प्राप्त झाली होती.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget