(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वसतिगृहातील आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण | मराठी १ नंबर बातम्या

वसतिगृहातील आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण


  
विधानसभा/लक्षवेधी

चार कर्मचाऱ्यांना अटक; संस्थाचालकांवर लवकरच कारवाई - दीपक केसरकर

मुंबई ( १ जुलै २०१९ ) : राजूरा (जि. चंद्रपूर) येथील शाळेच्या वसतिगृहातील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात वसतिगृहाचे अधीक्षक, सहायक अधीक्षक, वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असून संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

राजूरा (जि. चंद्रपूर) येथील इन्फन्ट पब्लिक जिजस स्कूलच्या वसतिगृहातील आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकरणाबाबत उपस्थित लक्षवेधी चर्चेला उत्तर देताना केसरकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुढे माहिती दिली की, या शाळेच्या संस्थाचालकांनी न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन मागितला आहे. न्यायालयाने त्यांना 8 जुलैपर्यंत अटक करु नये तसेच अटकेपूर्वी 72 तासाची नोटीस देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 72 तासांची नोटीस देण्यात आली असून 8 जुलैनंतर तत्काळ संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल. या पिडीत मुलींना मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री वैभव पिचड आणि सुनील केदार यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget