(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव | मराठी १ नंबर बातम्या

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

मुख्यमंत्री सहायता निधीला 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या

मुंबई ( २२ जुलै २०१९ ) : आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी संदेशाद्वारे तसेच दूरध्वनी करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, डॉ. हर्ष वर्धन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री मनिषा कोईराला, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच इतरही विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget