मुंबई ( १६ जुलै २०१९ ) : मुंबईतील डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत महिला व लहान मुलांसह निरपराध लोक सापडले आहेत तसेच काही लोकांना आपला जीव गमवावा लागला, ही अत्यंत क्लेशदायक गोष्ट आहे. सर्व मृत व्यक्तींच्या नातलगांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो तसेच सर्व जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा